जिद्द माणसाला यशस्वी बनविते हे दीपक शिंदे यांच्या धावपळीकडे पाहिले की पटते. गेली अनेक वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दीपक शिंदे यांनी बसविलेला जम पाहिला की त्यांचे कौतुक करावेसे वाटते. दोन्ही पायाने अपंग असूनही गेली ११ वर्षे सह्याद्री वाहिनीचे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी अनेक अडचणींवर मात करुन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, गड संवर्धन, साहस, पर्यावरण जगतातील अनेक घटना, विविध व्यक्तिमत्वांवर प्रकाश टाकला आहे -- गिरीष साळी, महाड
No comments:
Post a Comment