माझे गाव - नांदिवसे .........
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील हे आहे नांदिवसे गाव.... माझे गाव दर श्रावणी सोमवारी स्वयंदेवाच्या दर्शनाला शेकडो भाविक येतात. परंतु येथे येताना फार कष्ट घ्यावे लागत आहे. चिपळूण पासून 20 किलोमीटरच्या या प्रवासात अरुंद पूल, निक़ृष्ट रस्ता, गाने खडपोली या एमआयडीसीमधील खड्ड्यांचा रस्ता या सा-यांचा सामना करीत इथपर्यंत पोहचलो की नदीवरील जीर्ण झालेल्या पूलावरून जावे लागते. नांदिवसे गावातील शाळकरी मुले या शंकराच्या देवस्थानाच्या दर्शनाला येत असतात. परंतु या पुलावरून त्यांना जाताना पाहिले की जीव मुठीत धरावा लागतो. पाय-या चढून गेलो की खरोखर देव भेटत्याचे कृतकृत्य होते. चिपळून तालुक्यातील या देवस्थानाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांचा विचार केला तर हे गाव तीर्थस्थान म्हणून घोषीत करायला पाहिजे होते. परंतु येथील राजकीय अनास्था कारणीभूत आहे. या मदिरात जाण्यास पूल धोक्याचा झाला आहे. नदीला पावसाळ्यात प्रवाह देखील खूप मोठा असतो. त्यामुळे या पूलाचे काम लवकरात लवकर करायला पाहिजे. या गावाच्या जवळच व या दसपटीच्या पंचक्रोशीत दादर कळकवणे येथील 2एकरातील रामवरदायिनी मंदीर, तीवरे येथील पवित्र गंगास्थान ही सारी ठिकाणांचा विचार केला तर येथे धार्मिक पर्यटन म्हणून मोठे स्थान मिळू शकते. परंतु किमान रस्ते, पूल आणि नदीवरील छोटे बंधारे यांचे नियोजन केले तर येथील खुंटलेला विकास बहरून येईल यात शंका नाही.
(4 photos)रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील हे आहे नांदिवसे गाव.... माझे गाव दर श्रावणी सोमवारी स्वयंदेवाच्या दर्शनाला शेकडो भाविक येतात. परंतु येथे येताना फार कष्ट घ्यावे लागत आहे. चिपळूण पासून 20 किलोमीटरच्या या प्रवासात अरुंद पूल, निक़ृष्ट रस्ता, गाने खडपोली या एमआयडीसीमधील खड्ड्यांचा रस्ता या सा-यांचा सामना करीत इथपर्यंत पोहचलो की नदीवरील जीर्ण झालेल्या पूलावरून जावे लागते. नांदिवसे गावातील शाळकरी मुले या शंकराच्या देवस्थानाच्या दर्शनाला येत असतात. परंतु या पुलावरून त्यांना जाताना पाहिले की जीव मुठीत धरावा लागतो. पाय-या चढून गेलो की खरोखर देव भेटत्याचे कृतकृत्य होते. चिपळून तालुक्यातील या देवस्थानाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांचा विचार केला तर हे गाव तीर्थस्थान म्हणून घोषीत करायला पाहिजे होते. परंतु येथील राजकीय अनास्था कारणीभूत आहे. या मदिरात जाण्यास पूल धोक्याचा झाला आहे. नदीला पावसाळ्यात प्रवाह देखील खूप मोठा असतो. त्यामुळे या पूलाचे काम लवकरात लवकर करायला पाहिजे. या गावाच्या जवळच व या दसपटीच्या पंचक्रोशीत दादर कळकवणे येथील 2एकरातील रामवरदायिनी मंदीर, तीवरे येथील पवित्र गंगास्थान ही सारी ठिकाणांचा विचार केला तर येथे धार्मिक पर्यटन म्हणून मोठे स्थान मिळू शकते. परंतु किमान रस्ते, पूल आणि नदीवरील छोटे बंधारे यांचे नियोजन केले तर येथील खुंटलेला विकास बहरून येईल यात शंका नाही.



No comments:
Post a Comment