Monday, August 19, 2013

माझे गाव - नांदिवसे .

माझे गाव - नांदिवसे .........

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील हे आहे नांदिवसे गाव.... माझे गाव दर श्रावणी सोमवारी स्वयंदेवाच्या दर्शनाला शेकडो भाविक येतात. परंतु येथे येताना फार कष्ट घ्यावे लागत आहे. चिपळूण पासून 20 किलोमीटरच्या या प्रवासात अरुंद पूल, निक़ृष्ट रस्ता, गाने खडपोली या एमआयडीसीमधील खड्ड्यांचा रस्ता या सा-यांचा सामना करीत इथपर्यंत पोहचलो की नदीवरील जीर्ण झालेल्या पूलावरून जावे लागते. नांदिवसे गावातील शाळकरी मुले या शंकराच्या देवस्थानाच्या दर्शनाला येत असतात. परंतु या पुलावरून त्यांना जाताना पाहिले की जीव मुठीत धरावा लागतो. पाय-या चढून गेलो की खरोखर देव भेटत्याचे कृतकृत्य होते. चिपळून तालुक्यातील या देवस्थानाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांचा विचार केला तर हे गाव तीर्थस्थान म्हणून घोषीत करायला पाहिजे होते. परंतु येथील राजकीय अनास्था कारणीभूत आहे. या मदिरात जाण्यास पूल धोक्याचा झाला आहे. नदीला पावसाळ्यात प्रवाह देखील खूप मोठा असतो. त्यामुळे या पूलाचे काम लवकरात लवकर करायला पाहिजे. या गावाच्या जवळच व या दसपटीच्या पंचक्रोशीत दादर कळकवणे येथील 2एकरातील रामवरदायिनी मंदीर, तीवरे येथील पवित्र गंगास्थान ही सारी ठिकाणांचा विचार केला तर येथे धार्मिक पर्यटन म्हणून मोठे स्थान मिळू शकते. परंतु किमान रस्ते, पूल आणि नदीवरील छोटे बंधारे यांचे नियोजन केले तर येथील खुंटलेला विकास बहरून येईल यात शंका नाही.
 (4 photos)


अनोखी स्पर्धा

स्पर्धा ती अनोखीच झाली
मंत्री, आमदार होते त्यातही
जय्यत तयारी त्यांची , म्हणे
खड्यांवर बोलू काही

वडखळलाच सारे अडखळले
म्हणे इथेच करू या स्पर्धा
बक्षीसातही राखून ठेवू
आपापला वाटा अर्धा

छगनराव सरसावले...म्हणाले
बोलण्यापेक्षा करूनच दाखवतो
रस्त्यासोबत सा-यांनाच सन्मान हवा
खड्ड्यालाही समाजात आम्ही स्थान देतो

रवीशेठने घेतला चानस
स्थानिक म्हणून सांगतो ऐका
वेळच मिळाला कमी
नाहीतर खड्यातही खड्डा असता

तटक-यांनी माईक घेतला
रायगडचा इतिहास कथन केला
गाड्यांऐवजी घोडा वापरण्याचा
सा-यांनाच त्यांनी सल्ला दिला.

जयंतरावांचे नाव पुकारले
तेव्हा ते त्यांच्या बोटीत होते
खड्डे तसे चांगलेच आहेत
म्हणाले घेऊ बोटींचे नवीन ठेके





मधुशेठने आवाज टाकला
पीएच्या लॅपटॅवर निरोप धाडला
खड्डेमय भारत निर्माणाचा
सोनियांना अर्जच मेल केला

कागदांचा ढीग घेत
किरीट प्रकट झाले होते
खड्डे नाहीत हो हे...धरणेच ती
म्हणत पाटबंधारेवरच घसरले होते

खड्यांचा फॅन्सी ड्रेस करीत
बबनदादांचे शिलेदारही होते
सामुहिक निषेधापलीकडे
त्यांना काय सुचतच नव्हते

स्पर्धा रंगत होती,
खड्डा वाढत होता
काळरात्र सुरू झाली तरी
मशाली काही पेटत नव्हत्या....

दीपक शिंदे, महाड

Tuesday, July 30, 2013

रस्ता नाही, शाळा इमारत निकृष्ट आणि अंगणवाडीही नाही
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिक्षणासाठी ग्रामस्थांचा आटापिटा
महाड - छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेवाळेवाडी येथील प्राथमिक शिक्षणाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे. शाळेची इमारत संपूर्ण गळत असल्याने मुलांना शाळेत बसण अवघड झाले आहे. शाळेच्या भिंतींना तडे गेल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे की नाही याबाबत पालकांच्या मनात साशंकता आहे.
महाड तालुक्यातील रायगडवाडीमधील नेवाळेवाडीतील ही शाळा 2005 साली बांधण्यात आली. शाळेला स्लॅबची मंजूरी असताना देखील शाळेवर पत्रे टाकण्यात आले. या शाळा इमारतीमध्ये ब-याच प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे येथून सांगितले जाते. सोसाट्याच्या वा-यापुढे हया इमारतीवरील पत्रे तग धरू शकले नाहीत.  2007 च्या फयान वादळामध्ये यावरील पत्रे पाचशे मीटर अंतरापर्यत उडाले होते.  शाळेच्या या इमारतीची पुन्हा दुरूस्ती करूनही शाळेची गळती सुरूच आहे. शिक्षक व ग्रामस्थ यांनी मिळून पत्र्यावर प्लॅस्टीक टाकून त्यावर दगड रचून संरक्षण केले आहे. तरीही भिंतीतून पाणी गळून मुलांना शाळेत बसण अवघड झाले आहे.  शाळेचे बाधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने शाळेच्या इमारतीला आता तडे जात असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
 रायगडच्या पायथ्याशी किमान ३०० लोकसंख्या असलेली या  नेवाळे वाडीत सर्व रहिवाशी हे धनगर समाजाचे असून शेती व दुधदुभती जनावरे हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे. या गावाकडे  येण्यासाठी किमान २ कि मी पायपीट करावी लागते. पावसाळ्यात  या रस्त्याची अतिशय  बिकट अवस्था होते.  रायगडवाडी पासून 700 मीटर पर्यंतचा रस्त्याचे खडीकरण झाले असून पुढील दीड किलोमीटरचा रस्ता म्हणजे दगड व चिखलाची पायवाटच आहे.   अतिवृष्टीच्या काळात बाजूच्या गावातील मुलांना शाळेत येणे कठीण जाते  त्यामुळे  मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी अनेक समस्यांना  सामोरे जावे लागत असल्याने पटसंखेत घट होत आहे परिणामी शिक्षणाचा दर्जाही खालावत आहे.
अंगणवाडी देखील नाही
येथील प्राथमिक शिक्षणाची अवस्था पाहताना या नेवाळेवाडीमध्ये बालवाडीसाठी 25 मुले अंगणवाडीच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले. गेली चार वर्षे येथील ग्रामस्थ अंगणवाडीची मागणी करीत आहेत परंतु येथे महाड पंचायत समिती अंगणवाडी देऊ शकली नाही. त्यामुळे अंगणवाडीच्या मुलांसाठी असलेल्या शासकीय फायद्यांपासून येथील लहान मुले वंचित राहिली आहेत.
केंद्रशिक्षकाची वर्षातून एकदाच भेट
नेवाळेवाडीतील या शाळेत दोन शिक्षक असून दोन्ही शिक्षकांना येथे येण्यासाठी पराकाष्टा करावे लागते. या नेवाळेवाडीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत केंद्रप्रमुखांची वर्षातून एकदाच व्हिजीट झालेली दिसते. नोंदवहीतील नोंदीप्रमाणे यंदा जून महिन्यात तर 2012 सालात एप्रिल महिन्याव्यतिरिक्त 2012 सालात केंद्रशिंक्षक या शाळेत आलेलेच नाहीत. यामुळे या शाळेच्या इमारतीच्या पडझडीची व येथील इणारतीच्या निकृष्ट बांधकामाबाबत शासनदप्तरी कोणतीही नोंद नाही.
रायगड किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी याच राजधानीजवळील ही नेवाङेवाडीच्या शाळेची ही अवस्था आहे. ही वाडीच पूर्णत दुर्लक्षित झाली आहे. या वाडीला जोडून नगरभुवर ते खर्डी हा रस्ता झाल्यास येथील पर्यटनामध्ये देखील वाढ होईल परंतु येथे कायम दुर्लक्ष केल्याने आता नेवाळेवाडी, नगरभुवन सारख्या गावात तरुणांचेही स्थलांतर सुरत, बडोदा याठिकाणी झाले आहे. त्यामुळे स्थिरावलेल्या वयस्कर ग्रामस्थांचे व लहान मुलांचे हाल बघवत नाहीत. परंतु या ठिकाणी सुविधा पुरविण्यात लोकप्रतिनिधीसह स्थानिक व राज्य शासनही कमी पडेत ही लाजीरवाणी गोष्ट आहे. 









भ्रष्ट अधिकारी, 
बळी लोभी कर्मचारी.....    30july2013




सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचार हा चर्चेचा विषय ठरला आहे. भ्रष्टाचार आणि महसूल खात्यातील भ्रष्टाचार याबाबत आता तसे आश्चर्य वाटत नाही. परंतु हा भ्रष्टाचार इतका शिगेला पोहचला आहे की यावर आता ठोस पावले उचलायची गरज निर्माण झाली आहे. उपजिल्हाधिकारी जगन्नात वीरकर यांचा स्वीय सहाय्यक विनोद लचके याला जमीन बिनशेती प्रकरणात एकलाखाहून अधिक रक्कम रंगेहात घेताना पकडले. आणि त्यापुढची कमाल म्हणजे त्याच्या घरी सुमारे साठ लाखाची रोकड व काही चेक्स मिळाले. नियमानुसाल चालणा-या प्रशासनाला समांतर असे भ्रष्ट प्रशासन कसे हातात हात घालून कारभार करीत आहेत हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. यापूर्वी रायगडच्या उपजिल्हाधिकारी असलेले नितीस ठाकूर हे देखील कोट्यावधी रपयांच्या बेहिशोबी मालमत्तेबाबत आजही फरारी आहेत. म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात कशापद्धतीने व किती दिमाखदार पद्धतीने भ्रष्टाचार केला जातो हे यावरून सिद्ध होते.
सध्या रायगड जिल्हा हा आधुनिक विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आरसीएफ प्रकल्पानंतर सिडको, जेएनपीटी, ओएनजीसी आणि आताचा दिघी पोर्ट या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांकरीता लाखो हेक्टर जमीन येथील शेतक-यांनी दिली. परंतु त्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना अजूनही योग्य न्याय मिळाला नाही. याचा अनुभव घेता पेण आणि उरण भागात येणारा महामुंबई सेझ सारखे प्रकल्प शेतक-यांनी रोखला. शहापूर धेरंड येथे येणारा रिलायन्सचा प्रकल्प देखील रोखला. परंतु दरम्यानच्या काळात काही हेक्टर जमीन या धनदांडग्यांच्या घशात गेली. या विकासाच्या प्रकल्पात महसूल खात्याची भूमिका महत्वाची असते. आणि लाखो रुपयांची तोडपाणी करण्यात काही अधिका-यांनी आपली विद्वत्ता पणाला देखील लावली. शहापूर धेरंड येथील सरकारी जमीन रिलायन्सच्या घशात घालण्यासाठी आता उपजिल्हाधिकारी जगन्नात वीरकर यांचे नाव पुढे येत आहे. याबरोबर असे अनेक प्रकल्पाकरीता धनदांडग्यांना मदत करणारे काही उच्च महसूल अधिकारी देखील भविष्यात पुढे येणार आहेत. सध्या दिल्ली मुंबई कारिडारच्या भूसंपादनात अनेक अधिका-यानी आपली स्वप्न रंगविली असतील परंतु हे प्रकल्प शेतक-यांच्या विरोधाच्या रेट्यापुढे थांबविल्याने त्यांचे स्वप्न भंगले असणार. या अशा प्रकल्पामुळे असंख्य शेतकरी व जमीनदलाल जमीनी बिनशेती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जातात आणि हे महसूल अधिकारी करोडो रूपयांचे धनी होतात. जे दलाल फसवणूक करतात ते अशा अधिका-यांना हाताशी धरून कामे करतात परंतु एखादा साधा शेतकरी आपली जमीन घराकरीता बिनशेती करून घ्यायला जातो. तेव्हा अधिका-याची अपेक्षा तो पूर्ण करतोच असे नाही. मग लचके सारखा लोभी माणूस असा बळी जातो. आणि ज्या अधिका-यामुळे हे खालच्या कर्मचा-याला आपले हात बरबटावे लागतात ते अधिकारी मात्र मोकाट सुटतात.
जमीन बिनशेती बरोबर रायगड जिल्ह्यातील रेती उत्खनन हा सुध्दा तितकाच भ्रष्टाचाराला खुलेआम निमंत्रण देणारा विषय आहे. या बरोबर साध्या जातीच्या दाखल्यापासून ते रेशनिंग कार्ड पर्यंत सारेच कर्मचारी, अधिकारी सामान्य माणसाकडून दहा रुपये घ्यायला देखील लाज बाळगत नाही हे विशेष
महसूल खात्याबरोबर पोलीस खात्यातील भ्रष्टाचार हा रस्त्यावर जाता येता पाहता येण्यासारखा विषय आहे. जिथे जिते पोलीस टॅप आहे तिथे अऩेक लोकांना हा नित्यनेमाचा विषय झालाय. ट्रॅफीक पोलीस कोळशाच्या किंवा रेतीच्या डम्परच्या चालकाला कसे खुणावतो आणि नोट कशी घेतो हे खुलेआम पाहताना भ्रष्टाचार किती शिष्टाचार बनतोय हे लक्षात येते.
रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर असंख्य  ठिकाणी पोलीस टॅप आहेत. अनेक अवजड वाहने यावरून जात असतात परंतु आरटीओ पेक्षा ट्रॅफीक पोलीसच याकडे लक्ष ठेवून असतात. रेती वाहतूक,कोळसा वाहतूक, जेएनपीटीतून येणारे ट्रॅालर्स या सा-यांकडून रोज गोळा होणारा पैसा मोजला तर मोजता येणार नाही इतका पैसा जमा होतोय हा पैसा जातो कुठे, यात कोण वाटेकरी आहेत, हेच पैसे परत मतदारांना आमीष म्हणून वाटले जातात की अधिका-यांच्या घरी जातात याचा शोध लावला पाहिजे.
तूर्त एवढेच की सध्या रायगडात महसूल खात्याचा पर्दाफाश झालेला आहे  आणि पोलीस खात्याचा पर्दा रस्तोरस्ती  फडकत आहे.

दीपक शिंदे, रायगड.


Sunday, July 21, 2013

महाड तालुक्यातील दहिवड गावात जमिनीतील आवाजाचे गूढ कायम

रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील दहिवड गावात जमिनीतून स्फोटासारखे आवाज येत असल्याने गावात महिलांसह पुरुष देखील भितीच्या छायेत आहेत. एकीकडे पूर, दरड अशा संभाव्य घटनाचा मागोवा घेणारे जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन आता या आवाजाने बेजार झाले आहे.
रायगड जिल्ह्यात पडणारा मुसळधार पाऊस, डोंगरातून ओढ्यात खळाळणारे पाणी, धोक्याच्या पातळीपर्यंत वाढणारे नद्यांचे पात्र पाहता रायगड जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन जेरीस आलेले असताना महाड तालुक्यातील दहिवड गावातील जमिनीतून येणारे स्फोटासारखे आवाज आता आपत्कालीन व्यवस्थापनाला हादरवत आहेत. 3 जुलै रोजी आलेली तक्रार जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनापर्यंत गेल्यानंतर जिल्हा भूगर्भशास्त्र विभागापर्यंत जाण्यास तब्बल 12 दिवसाचा कालावधी लागला. या दिरंगाईमुळे आता दहिवड गावातील महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
1967-68 सालात आलेला भूकंप, त्यानंतर नानेमाची येथील जमिनीला पडलेल्या भेगा या घटनांनंतर 3 जुलैपासून येणारे हे भयावह आवाज दहिवड गावात चिंतेचा विषय बनला आहे. काल जिल्हा भूगर्भशास्त्र विभागाच्या पथकाने दहिवड गावाला भेट दिली. परिस्थितीची पाहणी केली, चर्चा केली परंतु ग्रामस्थांचे समाधान मात्र करू शकले नाहीत.
भूगर्भशास्त्र अभ्यासकांच्या मते हे परिणाम जमिनीची धूप, मातीचे उत्खनन, नदीतील रेतीचे उत्खनन आणि गावात बेसुमार झालेले बोअरवेल व त्यातून बाहेर आलेले पाणी. तरीही यात भिती बाळगण्याचे कारण नाही कारण या आवाजाबरोबर कोणताही हादरा बसत नाही हीच जमेची बाजू आहे.
आज तेरा दिवस झाले तरी या आवाजाचे गूढ उलगडले नाहीत. यामुळे दहिवड गावातील भय संपले नाही. या आवाजाने नक्की कोणती आपत्ती दहिवड गावात ओढवेल या चिंतेने आजही येथील ग्रामस्थ रात्ररात्र जागून काढीत आहेत.
इन्शुरन्स(Life Insurance) क्षेत्रातील कार्पोरेट एजंट म्हणून नावाजलेल्या पॅट्रान(patroun) या कार्पोरेट ग्रुपमध्ये मी सध्या काम करीत असून भारतातील सर्वच लाईप इन्शुरन्स कंपनीच्या पॅालीसी मी तुम्हाला देऊ शकतो. सध्या या ग्रुपमध्ये मी डीएम (development manager) या पदावर काम करीत असून आपल्याला इन्शुरन्स (Life Insurance) बाबत काही मार्गदर्शन हवे असेल तर अवश्य संपर्क साधा. माझा ईमेल आयडी dashindia09@gmail.com किंवा मोबाईल नंबर 8983918989, 8975918989 मार्फत संपर्क साधून आपल्याला हवे असलेल्या फायद्यासहीत आपण आपली पॅालिसी घेऊ शकता.
इन्शुरन्स(Life Insurance) क्षेत्रातील कार्पोरेट एजंट म्हणून नावाजलेल्या पॅट्रान(patroun) या कार्पोरेट ग्रुपमध्ये मी सध्या काम करीत असून भारतातील सर्वच लाईप इन्शुरन्स कंपनीच्या पॅालीसी मी तुम्हाला देऊ शकतो. सध्या या ग्रुपमध्ये मी डीएम (development manager) या पदावर काम करीत असून आपल्याला इन्शुरन्स (Life Insurance) बाबत काही मार्गदर्शन हवे असेल तर अवश्य संपर्क साधा. माझा ईमेल आयडी dashindia09@gmail.com किंवा मोबाईल नंबर 8983918989, 8975918989 मार्फत संपर्क साधून आपल्याला हवे असलेल्या फायद्यासहीत आपण आपली पॅालिसी घेऊ शकता.